Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

युवा परिवर्तन संस्थेतर्फे शाळांमध्ये मासिक पाळीविषयी मुलींना दिले जातेय मार्गदर्शन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली  – युवा परिवर्तन संस्थेतर्फे गडचिरोलीतील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनींना मासिक पाळीविषयी जनजागृती करणारे वर्ग आयोजित केले जात आहे. या वर्गात मासिक पाळीत सॅनिटरी पॅड कसे वापरावेत, त्या काळात आहार कसा ठेवावा ?, स्वच्छता कशी ठेवावी याविषयी इयत्ता पहिली ते दहावीतील मुलींना मार्गदर्शन केले जात आहे.

मासिक पाळीविषयी समाजात अजूनही अनेक गैरसमज पसरलेले आढळून येतात. अनेक मुलींना वयानुसार आपल्या शरीरात होणाऱ्या या बदलांविषयी माहिती नसते. यासाठी युवा परिवर्तन संस्थेतर्फे गडचिरोलीतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मासिक पाळीविषयी जगजागृती करणारे वर्ग घेतले जातात. आतापर्यंत 82 शाळांमध्ये हे वर्ग घेतलेले आहेत. यावेळेस विद्यार्थ्यांना मासिक पाळीच्या वेळेस शरीरात होणारे बदल, सॅनिटरी पॅड कसा लावायचा, त्याची विल्हेवाट कशी लावायची याची प्रात्यक्षिके दाखवली जातात. त्याचबरोबर मासिक पाळीच्या दिवसात आहार कसा असायला पाहिजे, व्यायाम काय करायला पहिजे याबदद्ल सुध्दा सांगितले जाते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

2000 सॅनिटरी पॅड्सचे वाटप
82 शाळांमध्ये आम्ही आतापर्यंत आम्ही 2000 सॅनिटरी पॅड्सचे वाटप केल्याचे संस्थेच्या कर्मचारी सायली कडस्कर यांनी सांगितले. गडचिरोलींमधील अनेक शाळांमध्ये मासिक पाळींविषयी मुलींना माहिती नाही. आणि शाळांमध्ये वर्ग घेताना मुलींच्या अनेक प्रश्नांचे आम्ही निरसन केले. आणि मुलींसोबत आम्ही काही शाळांमध्ये मुलांनाही मासिक पाळीविषयी माहिती देत आहे. जिल्हा परिषद शाळा धानोरा, मोहाली, तसेच स्व. रामचंद्रजी ढाकणे शाळा मुरुडगाव, महेश सावरकर पोरेतीवार हायस्कूल येथील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनीही चांगला प्रतिसाद दिल्याचेही त्या सांगतात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.