Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर,10 फेब्रुवारी :-जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्हास्तरीय अधिकारी / कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 9 ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहे. सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम.उपस्थित होते.

15 पंचायत समिती अंतर्गत अधिकारी / कर्मचारी तसेच मुख्यालयातील अधिकारी / कर्मचारी हे क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबाल, बॅडमिंटन, कॅरम, फुटबाल, धावणे (4×100, 200 मी, 400 मी. 800 मी. 1200 मी. 400 मी. हर्डल रेस) बुध्दीबळ, पोहणे, लांब उडी, गोळा फेक, टेबल टेनीस इत्यादी क्रीडा प्रकारात तसेच सांस्कृतीक कार्यक्रम वैयक्तीक गायन, सांघिक गायन, वैयक्तीक नृत्य, सांघिक नृत्य, प्रबोधनात्मक लघु एकांकिका, नकला, वाद्य वादन स्पर्धा व चित्रकला इत्यादी स्पर्धामध्ये सहभागी होणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) श्याम वाखर्डे यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संग्राम शिंदे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी धर्मराव आत्राम, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु) हर्ष बोहरे, कार्यकारी अभियंता (बांधकाम)र मेश शंभरकर, कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर,
जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रियंका रायपुरे, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, निखिता ठाकरे, तसेच 15 पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी स्पर्धक उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.