Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव

Get real time updates directly on you device, subscribe now.

इंग्लंडची मालिकेत 1-0 ने आघाडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चेन्नई डेस्क 09 फेब्रुवारी :- पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव झाला आहे, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या डावात टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांची आवश्यकता होती. मात्र भारतीय संघ 192 धावांवपर्यंत मजल मारु शकला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

इंग्लंडने भारताला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाचा दुसरा डाव 191 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 72 धावा केल्या. तर सलामीवीर शुबमन गिलने 50 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 3 तर जॅक लीच 4 विकेट्स घेतल्या. या विजयाह इंग्लंडने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचे पाच प्रमुख खेळाडू चेन्नई कसोटीत भारताच्या पराभवामागचे खलनायक ठरले आहेत.

टीम इंडियाचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेने भारतीय क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. रहाणेला या सामन्यात त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. रहाणे पहिल्या डावात अवघी एक धाव करुन बाद झाला. तर दुसऱ्या डावात त्याला भोपळाही फोडता आला नाही. रहाणेकडून दुसऱ्या डावात मोठ्या आणि जबाबदार खेळीची अपेक्षा होती. पण त्याने सपशेल निराशा केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.