Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दक्षिण आफ्रिकेला हरवून पाकिस्तान अजूनही सेमीफायनलच्या शर्यतीत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

टी-20, 03 नोव्हेंबर :-  टी-20 वल्र्डकप मध्ये आज पाकिस्तान विरूध्द दक्षिण आफ्रिका असा सामना खेळला गेला. पावसाचा व्यत्यय आल्याने सामन्यात पाकिस्तानचा 33 रन्सने विजय झाला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून पाकिस्तान अजुनही सेमीफायनलच्या शर्यतीत आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना पाकिस्तान ने 185 रन्स केले. फलंदाजी करतांना पाकिस्तानचे 43 रन्स वर 4 विकेट गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर शादाब खान आणि इफ्तिखार यांनी मजबूत खेळी खेळल्याने टीमला मदत झाली. पाकिस्ताननंतर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी आली तेव्हा पाकिस्तानी गोलंदाजांची धुमाकूळ घातला. गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच आफ्रिकेवर दबाव ठेवला. अशातच पावसाने हजेरी लावली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पावसानंतर डकवर्थ लुईसचे नियम लागू झाल्यावर दक्षिण आफ्रिकेला 14 ओव्हरमध्ये 142 रन्सचे लक्ष्यम मिळाले. पाउस थांबल्यानंतर सामना सुरू झाला. पाकिस्तान ने जोरदार गोलंदाजी करत अखेरीस 33 रन्स ने हा सामना जिंकला.https://youtu.be/tdv1X3Nni3k

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.