Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

T20 WC Final :- इंग्लंड दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड चॅम्पियन, पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मेलबर्न, 13 नोव्हेंबर:-  टी20 विश्वचषक स्पर्धेतील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीनं फायनलचा मुकाबला रंगला. पण अखेर बेन स्टोक्सच्या आणखी एका झुंजार खेळीनं इंग्लंडला पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनवलं. पाकिस्ताननं दिलेलं अवघं 138 धावांचं लक्ष्य इंग्लंडनं 5 विकेट्सच्या मोबदल्यात आरामात पार केलं. या विजयासह इंग्लंड टी20 वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्यांदा चॅम्पियन बनली. पण त्याचबरोबर 30 वर्षांपूर्वी याच ग्राऊंडवर पाकिस्ताननं वन वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा बदला घेतला. त्याचबरोबर वन डे आणि टी20 वर्ल्ड कप जिंकणारी इंग्लंड ही पहिलीच टीम ठरली. 2019 साली इंग्लंडनं वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यात आता जोस बटलरच्या टीमनं आणखी  एक वर्ल्ड कप ट्रॉफी इंग्लंडला जिंकून दिलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पाकिस्तानने 138 धावांच्या छोट्या लक्ष्याचा बचाव करताना जबरदस्त गोलंदाजी केली. इंग्लंडला सहजासहजी विजय मिळू दिला नाही. पाकिस्तानच्या अजून 10-15 धावा जास्त असत्या तर कदाचित निकाल वेगळा दिसला असता. इंग्लंडने दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. याच मेलबर्नच्या मैदानात 1992 साली पाकिस्तानने इंग्लंडला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. आज त्याच पराभवाची इंग्लंडने परतफेड केली. इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सने महत्त्वाची भूमिका बजावली. तो शेवटपर्यंत विकेटवर उभा राहिला. त्याने 49 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. इंग्लंडने पाच विकेटने वर्ल्ड कप जिंकला.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.