उमेश यादव कसोटी मालिकेतून बाहेर
युवा यॉर्कर किंगची टीम इंडियात निवड
नुकत्याच झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. मात्र या कसोटीदरम्यान भारताचा जलदगती गोलंदाज उमेश यादव याला दुखापत झाली होती.
मेलबर्न, दि. ०२ जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियासमोर खेळाडूंच्या दुखापतींमुळे अनेक आव्हानं उभी राहिली आहेत. नुकत्याच झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. मात्र या कसोटीदरम्यान भारताचा जलदगती गोलंदाज उमेश यादव याला दुखापत झाली होती.
या दुखापतीमुळे उमेश यादव तिसर्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौर्यावर एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात पदार्पण करणारा डावखुरा गोलंदाज टी. नटराजनला तिसर्या कसोटीत संधी मिळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतीच ट्विटरद्वारे याबाबतची माहिती जाहीर केली आहे. तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनीत खेळवला जाणार आहे
Comments are closed.