Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा तारा निखळला

रमेश देव यांच्या निधनाने अभिनयातला "देव" आपण गमावला. जेष्ठ सिने अभिनेते रमेश देव यांना मंत्री छगन भुजबळ यांची श्रद्धांजली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, ३ फेब्रुवारी : जेष्ठ सिने अभिनेते रमेश देव आपले संपूर्ण आयुष्य फक्त अभिनयासाठी वाहीले. देव यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर काही दशके अधिराज्य गाजवले त्यामुळे त्यांच्या जाण्याने अभिनयातला देव हरपला आहे.आज चित्रपटसृष्टीतील एक देखणा तारा निखळला आहे. उत्साहाचा झरा असणाऱ्या नायकाला आज आपण मुकलो अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी जेष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या शोकभावना व्यक्त करताना मंत्री भुजबळ म्हणतात की , वयाच्या नव्वदीतही काम करण्याची त्यांची तयारी होती. त्यामुळे त्यांची अभिनयाप्रति असलेली निष्ठा दिसून येते. रमेश देव यांच्या निधनाने अभिनयातला ” देव” आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने देव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय देव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

नॅशनल टेलिव्हिजन फॅशन शो 2022 मध्ये गडचिरोलीच्या कलाकारांनी मिळविले अव्वल स्थान

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शेंडीच्या डोंगरावर चढलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू तर एक जखमी

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.