Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दुचाकीला ट्रक धडक, एक ठार तर तिघींसह युवक जखमी ; भाऊबीज करून वापस येतांना घडली दुर्घटना

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : भाऊबि‍जेसाठी माहेरी गेल्याच्या आनंदात असताना दुचाकीवरून ट्रिपल सिट बाजाराला जाण्याचे निमित्त झाले. समोरून येणाऱ्या दुसऱ्या दोन महिलांच्या दुचाकीसोबत त्यांची धडक झाली आणि पाचही जण रस्त्यावर पडले. त्याच वेळी काळ बनून आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. या अपघातात एक महिला पूर्णपणे ट्रकखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित चार गंभीर जखमी झाले.

हा दुर्दैवी अपघात गुरूवारी (दि.7) दुपारी कोरची तालुक्यातल्या बेडगावनजिकच्या कोसमी गावाजवळ घडला. सेवाबाई रामसाय कोरेटी (35 वर्ष) रा.दामेसरा, ता.कुरखेडा) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात रमशिला दसरू काटेंगे (36 वर्ष, रा.दोडके, छत्तीसगड), माणिक नरेटी (25 वर्ष, रा.गोठणपार,ता.देवरी, जि.गोंदिया), दर्शना माणिक हलामी (22 वर्ष) आणि सोनम मडावी (24 वर्ष) गंभीर जखमी झाल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सेवाबाई आणि रमशिला या बहिणी भाऊबि‍जेसाठी माहेरी चिलमटोला या गावी गेल्या होत्या. कोरची येथील आठवडी बाजार असल्याने त्या बहिणी माणिक नरेटी या नातेवाईक युवकासोबत बाजारासाठी जात होत्या. त्याचवेळी दोन युवती समोरून येत असताना दोन्ही दुचाकींची धडक झाली. सर्वजण खाली कोसळले असताना मागून येणाऱ्या लोहखनिजाच्या ट्रकने त्यांना चिरडले. सर्व जखमींना आधी कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.