Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल चळवळीला मोठा धक्का? ‘देवजी’च्या आत्मसमर्पणाची चर्चा

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २२ फेब्रुवारी २०२६ :

देशातील नक्षलवादी कारवायांचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिबंधित संघटना Communist Party of India (Maoist) (सीपीआय-माओवादी) चे सरचिटणीस थीप्पिरी तिरुपती उर्फ ‘देवजी’ यांनी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नसला तरी लवकरच याबाबत स्पष्ट घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सूत्रांच्या माहितीनुसार, ६२ वर्षीय देवजी यांनी तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात शस्त्रांसह शरणागती पत्करली. त्यांच्या सोबत १५ ते २० सशस्त्र कार्यकर्त्यांनीही आत्मसमर्पण केल्याची चर्चा आहे.

मोठ्या बक्षिसाचा मोस्ट वाँटेड नेता

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

देवजी हे मूळचे तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील रहिवासी असून, गेली साडेतीन दशके ते नक्षल चळवळीत सक्रिय होते. संघटनेतील महत्त्वाचे रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्र, तेलंगणा आणि इतर राज्यांनी मिळून त्यांच्या अटकेसाठी सुमारे १० कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

मे २०२५ मध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत तत्कालीन सर्वोच्च नेता नाबाला केशवा राव उर्फ बसवराजू ठार झाल्यानंतर देवजी यांच्याकडे संघटनेची सूत्रे सोपविण्यात आली होती. अवघ्या आठ महिन्यांतच त्यांच्या आत्मसमर्पणाची चर्चा सुरू झाल्याने संघटनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

नक्षलविरोधी कारवायांचा प्रभाव?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे. त्यानुसार छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमावर्ती भागात सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त मोहिमा तीव्र केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेक वरिष्ठ नक्षल नेत्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारल्याची उदाहरणे समोर आली आहेत.

नेतृत्वावर प्रश्नचिन्ह..

देवजी यांच्या आत्मसमर्पणावर शिक्कामोर्तब झाल्यास, एका वर्षाच्या आत दुसऱ्यांदा संघटना सर्वोच्च नेतृत्वाविना राहणार आहे. सध्या वरिष्ठ स्तरावर काही मोजके नेतेच सक्रिय असल्याची माहिती मिळते. त्यातील काही जण प्रकृती अस्वस्थतेमुळे अथवा भूमिगत असल्याचे सांगितले जाते.

अधिकृत घोषणा झाल्यानंतरच या घडामोडींना अंतिम स्वरूप मिळणार असले तरी, देवजींच्या संभाव्य आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीच्या भवितव्याबाबत नवे प्रश्ननिर्माण झाले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.