Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोनाच्या संकटकाळात बुद्धांची करुणा आमच्यासोबत – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

बुद्ध पौर्णिमेनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांना दिली बुद्ध मूर्ती भेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई दि. २६ मे – कोरोना च्या संकटकाळात भगवान बुद्धांची करुणा आमच्या सोबत आहे. सर्वांनी करुणा आपल्या मनी बाळगावी असे आवाहन महाराष्ट्र् राज्याचे राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांनी केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त राज भवन येथे राज्यपाल यांची भेट घेऊन सुंदर बुद्ध मूर्ती सप्रेम भेट दिली. या वेळी कमानी ट्युबस कं च्या बुद्ध पौर्णिमा कॅलेंडर चे राज्य पालांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

Rajyapal Bhagatsingh Koshyari

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“शांती शिवाय विकास नाही. भगवान बुद्धांचा धम्म हा समतेवर  आधारित आहे.शांती अहिंसा करुणा या तत्वांवर आधारलेला बौद्ध धम्म संपूर्ण जगात प्रसारित झाला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगात सर्वश्रेष्ठ असा बौद्ध धम्म दिला याचा आम्हाला अभिमान आहे.” असे प्रतिपादन यावेळी ना. रामदास आठवले यांनी केले आहे.

Ramdas Athawale

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय व आधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार ना. रामदास आठवले यांनी आज २६ मे २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता विश्व शांतीदुत, तथागत गौतम बुध्द यांच्या २५६४ व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे शुभेच्छा भेट घेण्यात आली. ना. रामदासजी आठवले यांच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना बुध्दांची मूर्ती भेट देण्यात आली. या प्रसंगी बौध्द धर्मगुरु भिक्खुंना चिवरदान करण्यात आले.

यावेळी भन्ते विररत्न, भन्ते कश्यप, कल्पना सरोज, आशिष देशपाडे, मा.घनश्याम चिरणकर, प्रविण मोरे आणि महेश लंकेश्वर उपस्थित होते.

हे देखील वाचा :

यास चक्रीवादळ आज ओडिशा-बंगालच्या किनाऱ्याला धडकणार

(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

म्युकरमायकोसिसशी लढा देण्यासाठी अजित पवारांची मोठी घोषणा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.