Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गरीब आदिवासी मुलांची वेठबिगारीसाठी मेंढपालांना विक्री प्रकरण

श्रमजीवी संघटनेकडून विक्री झालेल्या मुलांची शोधमोहीम सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई दि.10 सप्टेंबर :-  नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील कातकरी पाड्यांवरच्या मुलांची प्रत्येकी केवळ ५ हजार रुपये आणि एका मेंढीच्या बदल्यात खरेदी करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे समोर आले आहे. इगतपुरी तालुक्यातील उभाडे शिवारातील गौरी आगिवले या १० वर्षीय बालिकेच्या संशयास्पद मृत्यूने हे रॅकेट उघडकीस आले. आतापर्यंत इगतपुरी तालुक्यातील अशा ३० मुलांची विक्री झाल्याचे धक्कादायक वास्तव रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या श्रमजीवी संघटनेने समोर आणले.

श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विक्री झालेल्या मुलांची शोधमोहीम
राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. विवेक पंडित मार्गदर्शनाखाली श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अशा कातकरी आदिवासींच्या गरिबीचा, अज्ञानाचा आणि अगतिकतेचा फायदा घेऊन विक्री झालेल्या मुलांची शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील विक्री झालेल्या ३० मुलां पैकी ६ मुलांना शोधण्यात तसेच, त्यांच्या मालकांविरोधात (मेंढपाळ) विरोधात गुन्हे दाखल करण्यात श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकारयांना यश आले आहे. तर २४ मुलांचा शोध सुरु आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर, दुसरीकडे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात देखील श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज दोन अल्पवयीन मुलांना मेंधापालांच्या तावडीतून मुक्त केले आहे.
कल्पेश पांडूरंग शिंगाडे वय १२ राहणार ब्राह्मणपाडा ता.मोखाडा, जि.पालघर असे मुक्त केलेल्या मुलाचे नाव आहे. तर, या प्रकरणी मेढपाळ शिवाजी महादू हाके आणि पांडू दामू कोलपे यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर दुसरीकडे भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत माणिक कोळपे रा. असनोली या धनगराकडे सचिन मदन वाघ रा. सुर्यमाळ वय 13 वर्ष या मुलाच्या पालकांना 2000 रुपये देवून मुलं सांभाळण्यासाठी ठेवले होते, तर, भिकाजी टबले रा. जांभिवली या धनगराकडे दीघाशी येथील विकास मंगेश सवर वय वर्षे 12 या मुलाला दर महा 1300 रुपये देवून मेढर चारायला ठेवलं होते, या प्रकरणी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे दोन्ही मुलांची सुटका करण्यात आलि असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

हे देखील वाचा :-

Comments are closed.