Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिल्लीत परत कधी पण लॉकडाऊन सुरू होऊ शकते ? मुख्यमंत्री केजरीवालांचा महत्त्वाचा निर्णय.

केजरीवाल  सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला हा प्रस्ताव.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क : दिल्लीत कोरोना रुग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, आम्ही लहान स्तरावरचा लॉकडाऊनचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. हे आंशिक लॉकडाउन असेल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यासह सीएम केजरीवाल यांनी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विवाह सोहळ्याला येणार्‍या लोकांची संख्याही कमी करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. आता फक्त 50 लोक लग्न सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. सीएम केजरीवाल म्हणाले की, ‘गर्दी वाढल्यास बाजारपेठा बंद केल्या जातील.’ दिल्तीत गेल्या 10 दिवसांत नवीन प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. दिवसाला 8000 पेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. प्रदूषण, जास्त चाचणी, निष्काळजीपणा यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. केंद्राचा निर्णय वर दिल्लीत लहान स्तरावरचा लॉकडाऊनचा विचार करता येणार आहे.

Comments are closed.