Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

 ‘लाडक्या बहीणा’ला दादांची रक्षाबंधनच्या आधीच  भेट,पहिला हफ्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे पाठवण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 17 ऑगस्ट रोजी पहिला हप्ता मिळणार आहे. या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे पाठवण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

ऑगस्ट महिन्याच्या येत्या १७ तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता लाभार्थी महिलांना मिळणार आहे. यासंदर्भातील मोठा निर्णय हा आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. झालेल्या निर्णयानुसार येत्या १७ तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, अजित पवार यांनी रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात जमा होणार असा शब्द दिला होता.

यानुसार आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अजित दादांनी खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेच्या पहिल्या हफ्त्याची रक्कम पाठवण्याचा निर्णय घेतल्याने महिलांना भेट मिळणार आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली यानंतर महिलांचा राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. राज्यभरात आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज देखील केला असून त्यांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.