Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 9 जून – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या.

शरद पवारांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे.  मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याच्या गृहमंत्री जबाबदार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल करत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शरद पवार यांना जी धमकी देण्यात आली आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात यावा, त्यानंतर या प्रकरणी एक महिला आणि नागरिक म्हणून मी न्याय मागत आहे. या सगळ्याची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य सरकारची आणि गृह मंत्रालयाची आहे. राज्यात जे काही सुरु आहे, त्यामुळे गृह खाते पूर्णतः अयशस्वी ठरले आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही असेही सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर हे सरकारच्या गुप्तचर खात्याचे अपयश असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.