Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्ली शहरात ठिकठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी

ग्रामपंचायत आलापल्ली सरपंच शंकर मेश्राम यांचा पुढाकार,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आलापल्ली दि ३० एप्रिल : आलापल्ली शहरात ग्रामपंचायतच्या वतीने स्थानिक आलापल्ली शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आलापल्ली येथील मुख्य चौक,बँक , शासकीय कार्यालये ,दवाखाने आदी ठिकाणी सोडियम हायपोक्लोराइड ची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले.

कोरोना विषाणूंचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आलापल्ली शहरात स्वच्छतेवर अधिकाधिक भर देण्यात येत आहे. सफाई कर्मचार्या तर्फे नियमित मुख्य रस्त्याची साफसफाई करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी नाली, उघड्या जागेवर प्लास्टिक, अन्न व इतर कचरा टाकू नये, याची आपल्या स्तरावरून खबरदारी घ्यावी व अतिआवश्यक काम असेल तरच बाहेर पडावे अन्यथा घरीच राहा सुरक्षित राहा व मास्क , विषाणूंरोधकाचा वापर करावा ,गर्दीच्या ठिकाणी शारीरिक अंतर ठेवावे असे आवाहन आलापल्ली ग्रामपंचायतीचे सरपंच शंकर मेश्राम यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.