Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ.राजेंद्र कुमार शर्मा यांची गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड,आयआयटी दिल्ली येथील गणिताचे होते प्राध्यापक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मिलिंद खोंड 

गडचिरोली दि २३ मार्च :- दिल्ली आयआयटी येथे दीर्घ काळ गणिताचे प्राध्यापक असलेले आणि सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन अध्यासन पद धारण करीत असलेल्या डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजी गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ राजेंद्र कुमार शर्मा (जन्म २० नोव्हेंबर १९५८) यांनी मेरठ विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून आयआयटी दिल्ली येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांनी फ्रांस व जर्मनी येथे पोस्ट डॉक्टरल शिक्षण प्राप्त केले आहे. डॉ. शर्मा यांनी आयआयटी खडकपूर येथे अध्यापनाला सुरुवात केली व सन २००२ पासून ते दिल्ली आयआयटी येथे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दिनांक १ जानेवारी २०१९ रोजी त्यांची स्वित्झर्लंड येथे कन्सेनसिस ब्लॉकचेन या संशोधन अध्यासनावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना अध्यापनाचा ३२ वर्षांचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली आहे.

कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी पाटणा व दिल्ली उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती न्या. राजेंद्र मेनन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति गठित केली होती. इंडियन इंस्टीट्युट ऑफ सोशल एंड इकोनोमिक चेंज, बंगलोर येथील संचालक डॉ. एस माधेश्वरन व शासनाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर या समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ राजेंद्र कुमार शर्मा यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.