Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुरुगाव-मालेगाव जंगल परिसरात हत्तींची एन्ट्री

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २३ ऑगस्ट:  जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मुरुगाव- मालेगाव जंगल परिसरात पुन्हा एकदा हत्तींची एन्ट्री झाली आहे.ओरिसा राज्यातून हा हत्तींचा कळप आल्याचे समजते.

मुख्य वनसंरक्षक डॉ. मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या कळपावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंगालचे हुलला पार्टी पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. गतसाली ऑक्टोबर महिन्यात छत्तीसगड राज्यातून हत्तींनी प्रवेश केला होता. त्यावेळी हत्तींनी शेतपिकांसह घरांचेही नुकसान केले होते. काही दिवसांपूर्वी पुन्हा हा कळप जिल्ह्यात आला होता. व धुमाकूळ माजवून प्रचंड नुकसान केले होते. पुन्हा तसेच नुकसान होऊ नये म्हणून वनविभाग यावेळी सतर्क झाला।आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या हत्तींच्या कळपावर लक्ष ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ८ सदस्य असलेली हुलला पार्टी हत्तींवर नियंत्रण आणण्याचे अतोनात प्रयत्न करीत आहे.

या पथकाकडून आपल्या कडील काही लोकांना प्रशिक्षण देण्याचे कामही करत आहे. तसेच वनविभाग हा कळप गावात पोहचू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करीत आहे.असे डॉ. मानकर यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

सायबर युनिट अधिक सक्षम करणार – देवेन्द्र फडणवीस

 

“महामार्गावर टोल वसुल होतात पण रस्त्याच्या देखभालीकडे केले जाते दुर्लक्ष”

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.