Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि. 15 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे 2 ते 11 डिसेंबर 2024 या कालावधीत पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतांना उमेदवारांना डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेर, पूणे (डीएसडब्ल्यू) यांच्या वेबसाईट www.mahasainik.maharashtra.gov.in वर जाऊन other-PCTC Nashik- SSB ५९ कोर्ससाठी संबंधित परिशिष्टांची उपलब्ध करून दिले जाईल किंवा व्हॅाटस अप नं. 9156073306 या मोबाईल क्रमांकावर एसएसबी-59 हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट व्हॉटसअप द्वारे पाठवले जातील. प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन येणे आवश्यक आहे.

(1) कम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसई- यूपीएससी ) अथवा नॅशनल डिफेन्स एकॅडमी एक्झामिनेशन (एनडीअे – यूपीएससी) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. (2) एन.सी.सी. ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा बी ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एन.सी.सी . ग्रुप हेडक्वार्टर्सने एस.एस. बी. साठी शिफारस केलेली असावी. (3) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. (5) युर्निव्हरसिटी एन्ट्री स्कीम साठी एस.एस.बी. कॉल लेटर असावे किंवा एस.एस. बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी- [email protected] व दुरध्वनी क्रमांक 0253-2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.