Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Good News:-कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरतोय, गेल्या 24 तासात 3.29 लाख नव्या रुग्णांची भर

गेल्या 24 तासात देशात 3.29 लाख कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : काही दिवसांपासून चार लाखांचा टप्पा पार करणारी कोरोनाची आकडेवारी आज कमी आली असून गेल्या 24 तासात देशात 3,29,942 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासात 3,56, 082 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत तर 3,876 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. सोमवारी ही 3.66 लाख नव्या रुग्णांची भर पडली होती.

गेल्या काही दिवसांची तुलना करता ही संख्या कमी असली तरी देशासमोरील चिंता अजून काही कमी झाली नाही. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा आणि बेड्स तसेच कोरोनाच्या लसींचा तुटवडा आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशात कोरोनाची आजची स्थिती
मागील 24 तासातील नव्या रुग्णांची संख्या – 3 लाख 29 हजार 942
मागील 24 तासातील कोरोनामुक्तांची संख्या – 3 लाख 56 हजार 082
मागील 24 तासातील मृतांची संख्या – 3 हजार 876
एकूण कोरोनाबाधितांची संख्या – 2 कोटी 29 लाख 92 हजार 517
एकूण कोरोनामुक्तांची संख्या – 1 कोटी 90 लाख 27 हजार 304
एकूण सक्रिय रुग्णांची संख्या – 37 लाख 15 हजार 221
एकूण मृतांची संख्या – 2 लाख 49 हजार 992
एकूण लसीकरण – 17 कोटी 27 लाख 10 हजार 066

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम झाला असल्याचं मागील काही दिवसांच्या रुग्णांच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. सोमवारी राज्यात 61,607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर नवीन 37,326  रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच  549 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जवळपास महिन्याभरानंतर कोरोना रुग्णांचा एका दिवसातला आकडा 40 हजारांच्या खाली आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

{पण वाचा :-आंध्र प्रदेशमध्ये ऑक्सिजनअभावी 11 रुग्णांचा मृत्यू}

Comments are closed.