Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आद्यक्रांतिकारक शहीद “बिरसा मुंडा” यांना श्रमजीवी संघटनेकडून अभिवादन!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

उसगाव दि.९ जून :- भारतीय स्वातंत्र्य लढयात आदिवासींच्या संग्रामाला इतिहासात मोठे स्थान मिळवून देणारे आद्यक्रांतिकारक शहीद “बिरसा मुंडा” यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज श्रमजीवी संघटनेकडून त्यांना अभिवादन करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या उसगाव डोंगरी येथील मुख्यालयाच्या आवारात असलेल्या त्यांच्या भव्य पुतळ्याला संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड,जिल्हाउपाध्यक्ष तुषार सांबरे, जिल्हा सरचिटणीस गणेश उंबरसाडा, कामगार संघटनेचे खजिनदार महेश धांगडा तसेच विधायक संसद आणि संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून- मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले. यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले त्यांना इंग्रजांविरूध्द लढण्यास प्रेरित केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारून इंग्रजांना जेरीस आणले होते.

“उलगूलान जिंदाबाद” चा नारा देत त्यांनी इंग्रजांविरूध्द विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हंटले ‘‘ आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायदयांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्विकारत नाही. जो ही इंग्रज आमच्या विरूध्द उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू. यामुळे संतप्त ब्रिटीश सरकारने आपली सेना पाठवून बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविले. बिरसा मुंडास पकडून देणा-यास इग्रजणी त्याकाळी ५०० रूपये बक्षिस जाहीर केले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी ३ फेब्रुवारी १९०० ला हल्ला करून विद्रोहीचे ठिकाणे उध्वस्त केले व बिरसामुंडा यांना अटक केली. त्यांच्या सोबत ४६० आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली. इंग्रजांनी तुरुंगात अतोनात छळ केला.

९ जुन १९०० रोजी रांची या कारागृहात रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यु झाला होता. काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले असावे असे बोलले जात असले तरी इंग्रजांनी त्यांच्या मृत्युचे कारण प्लेग सांगीतले आहे.

जननायक बिरसामुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले गेले आहे. ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे.

“लोकस्पर्श न्यूज” कडून या महान क्रांतिकारकाला विनम्र अभिवादन.

 

हे देखील वाचा,

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.