Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“फॅशन शो” ला गडचिरोलीत उदंड प्रतिसाद

मॉडेलिंग स्पर्धेत मुले आणि मुलीनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली 11 फेब्रुवारी:- जेएमएम स्टार इव्हेंट्सतर्फे आयोजित ग्लॅम फेस ऑफ विदर्भ आणि ब्राइडल मेकअप स्पर्धेला येथील फॅशन प्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी फेम स्मिता गोंदकर उपस्थित होत्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस कु.शिवानी वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, उद्योजक मनोज देवकुळे, सामाजिक कार्यकर्त्या छायाताई कुंभारे, डॉ.खुशबु दुर्गे, गीता हिंगे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत एकूण 130 स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपले कलाकौशल्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अगदी लहान मुला-मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी आपली कला सादर केली. विजेत्या स्पर्धकांना स्मिता गोंदकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रसिद्ध ब्युटीशियन आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योती उंदिरवाडे यांच्यासह उद्योजक मनोज खोब्रागडे आणि मेकअप आर्टिस्ट मोनिका निंबेकर यांनी संयुक्तपणे या विदर्भस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये गडचिरोलीतील कलाप्रेमी व कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा कार्यक्रम अविस्मरणीय व ऐतिहासिक बनवला. गडचिरोलीच्या इतिहासात प्रथमच सेलिब्रिटींच्या उपस्थितीत एवढा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्मिता गोंदकर यांनी ‘पप्पी दे पप्पी दे’ या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमात कु.शिवानी विजय वडेट्टीवार यांनी आयोजकांचे अभिनंदन करून स्पर्धा राज्यस्तरीय करण्याची इच्छा व्यक्त केली.

तनिष्का असोपा ही प्रथम श्रेणीत विजेती, पहिली उपविजेती सोनम मॅटे, द्वितीय उपविजेती किंजल धरमशाली, तर किड्स बॉय कॅटेगरीत श्रुवीत विजेता ठरला. मेंद, प्रथम उपविजेता रिदन कोसे, द्वितीय,मिस श्रेणीमध्ये अनुश्री निमसरकर विजेती, प्रथम उपविजेती मोना बोरकर, द्वितीय उपविजेती गीतिका खरवडे. मिसेस गटात भारती मोटघरे ही विजेती, प्रथम उपविजेती देवकी कंकडालवार, द्वितीय उपविजेती अश्लेषा पाटील. मिस्टर गटात सुजल गोवर्धन विजेता, पहिला उपविजेता सुरजित सिंग दुसरा उपविजेता प्रज्वल गाडेकर. मॅनहंट कॅटेगरीत गणेश गव्हारे विजेता, प्रथम उपविजेता अब्दुल शेख, द्वितीय उपविजेता शुभम गावंडे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ब्रायडल मेकअप स्पर्धेच्या विजेत्या प्रिया राजुलकर, प्रथम उपविजेत्या अहिजा खान, द्वितीय उपविजेत्या नम्रता पाटील होत्या. रसिकांचा प्रतिसाद पाहून अभिनेत्री स्मिता गोंदकर भारावून गेली. तिने आयोजक आणि चाहत्यांचे कौतुक केले. गडचिरोलीसारख्या छोट्या शहरातही अशा प्रकारची स्पर्धा इतक्या चांगल्या पद्धतीने होऊ शकते, असे सांगून तिने या उपक्रमाचे कौतुक केले.

अ‍ॅड. कविता मोहोरकर, केतन आरमरकर, नम्रता पाटील यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले तर एम.जी. झीशानने कार्यक्रमाचे अँकरिंग केले. भविष्यातही असे आणखी कार्यक्रम आयोजित केले जातील, असे कार्यक्रमाच्या मुख्य संयोजक कु. ज्योती उंदिरवाडे यांनी सांगितले. अरविंद कात्रटवार, रेखाताई डोळस, विश्राम होकम, जितू धात्रक, रहीम लखानी, डॉ. बाळू सहारे, डॉ. अद्वैत अप्पलवार, महेश काबरा, अॅड. संदीप धाईत, टॉस कॅफे, रुबाब मेन्स, वेअर, कॅपेलो सलून, सूरज सातपुते, नलिनी बोरकर, समिक्षा रामटेके, स्वप्नील लोखंडे, कुलदीप गेडाम, रोहित खोब्रागडे, तन्मय उंदिरवाडे, रवीना धकाते, बिपाशा भुरसे यांनी मोलाचे सहकार्य केले.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.