पेट्रोलच्या किंमतीत १५ ते १७ पैशांनी वाढ झाली तर डिझेलच्या किंमतीत १५ ते १९ पैशांनी वाढ झालीय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 3 डिसेंबर:- पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आज २० नोव्हेंबरनंतर सलग ११ व्या दिवशी वाढ होताना दिसतेय. पेट्रोलच्या किंमतीत १५ ते १७ पैशांनी वाढ झाली तर डिझेलच्या किंमतीत १५ ते १९ पैशांनी वाढ झालीय. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर १७ पैशांनी वाढले तर डिझेलचे दर १९ पैशांनी वाढले. दिल्लीमध्ये काल पेट्रोलचा दर ८२.४९ प्रति लीटर होता. जो आज वाढून ८२.६ रुपये प्रति लीटर झाला.
मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत १४ पैशांनी वाढली. ही किंमत ८९.१६ हून वाढून ८९.३३ रुपये प्रति लीटर झालीय. चेन्नईमध्ये काल ८५.४४ रुपये प्रति लीटर होते तर ८५.५९ रुपये प्रति लीटर झाले. याप्रकारे डिझेलच्या किंमतीत देखील वाढ झालीय. दिल्लीमध्ये डिझेलचा भाव ७२.६५ रुपये प्रति लीटर होते. जे आज ७२.८४ रुपये प्रति लीटर झालंय. मुंबईत डिझेलच्या ७९.४२ प्रति लीटरने विकलं जातंय. तर कालचा दर ७९.२२ रुपये प्रति लीटर होतं.
Comments are closed.