भारत वनक्षेत्रात जगात तिसऱ्या क्रमांकावर
चीन पहिल्या ,ऑस्ट्रेलिया दुसरया तर भारत तिसऱ्या क्रमांकावर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
देहरादून : डेहराडून येथील वन संशोधन संस्था ही भारतातील वनक्षेत्रातील वाढ, बदल, स्थित्यंतरे याचा सखोल अभ्यास करत असते. नुकताच संस्थेने २०२३ चा राष्ट्रीय वन अहवाल केंद्र सरकारला सादर केला असून भारत जगातील वनक्षेत्रातदेखील तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे.
देशाची सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असताना, जगाच्या पाठीवर वनक्षेत्रातदेखील भारत ‘टॉप टेन’ मध्ये आहे. वनक्षेत्रात चीन अव्वलस्थानी असून, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, तर भारत देश तिसऱ्या स्थानी आहे. जागतिक वन संशोधनाच्या अहवालातील हे चित्र दिलासादायक मानले जात आहे. डेहराडून येथील वन संशोधन संस्था ही भारतातील वनक्षेत्रातील वाढ, बदल, स्थित्यंतरे याचा सखोल अभ्यास करते. नुकताच संस्थेने राष्ट्रीय वन अहवाल २०२३ केंद्र सरकारला सादर केला. पश्चिम घाटापासून थरचे वाळवंट, सुंदरबन ते खारफुटीपासून हिमालय पर्वत, अल्पाइन कुरणासह भारतात असलेल्या अफाट वनसंपत्तीचे मूल्यांकन, निरीक्षण करून संस्थेने १३ डिसेंबर २०२४ रोजी आपला अहवाल केंद्र सरकारच्या वन मंत्रालयास सादर केला.
त्याकरिता देशातील ३६ राज्य, केंद्रशासित प्रदेशातील वनांचा हवाई सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. भारताला वनांच्या बाबतीत उत्तराखंड ७१ टक्के, अंदमान- निकोबार ३६ टक्के, त्रिपुरा ६० टक्के, सिक्कीम ८२ टक्के, मणिपूर ७८ टक्के, हिमाचल प्रदेश ६८ टक्के, छत्तीसगड ४४ टक्के आणि अरुणाचल प्रदेशात ६१ टक्के वनक्षेत्र आहे. दरम्यान उत्तर प्रदेश, महाराष्ट्र ही मोठी राज्ये वनक्षेत्रात मागे पडलेली दिसून येत आहेत. काही राज्यांमुळे मानाचे स्थान मिळालेआहे.
चीनची वनक्षेत्राच्या सरासरी वाढीत १९३७ चौरस कि. मी. वनक्षेत्रासह अव्वलस्थानी आहे, तर ऑस्ट्रेलिया ४४६ चौरस कि.मी. वनक्षेत्रासह अनुक्रमे दुसऱ्या आणि भारत २६६ चौरस कि.मी. वनक्षेत्रासह अनुक्रमे तिसऱ्या स्थानी आहे. चिली १४९ चौरस कि.मी., व्हिएतनाम १२६ चौरस कि.मी., तुर्की ११४ चौरस कि.मी., अमेरिका १०८ चौरस कि.मी., फ्रान्स ८३ चौरस कि. मी., इटली ५४ चौरस कि.मी., रोमानिया ४१ चौरस कि.मी. असे दहा देश वनक्षेत्रात ‘टॉप टेन’ यादीत आहे. अमेरिका यामध्ये सातव्या क्रमांकावर आहे.
हे ही वाचा,
Comments are closed.