Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

छत्तिसगडच्या सुकमा येथील जहाल महीला नक्षलवादी गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात…

महीला नक्षली मुडे हिडमा मडावीवर होते २ लाखांचे बक्षीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ५ ऑगस्ट:-नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या नक्षलविरोधी अभियानाला आणखी एक मोठं यश मिळाले आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यात नक्षली कारवायांमध्ये सहभागी असलेल्या मोस्ट वाँटेड महिला नक्षलवादी छत्तिसगडमधील सुकमा जिल्हयातील जहाल महीला नक्षली “मुडे हिडमा मडावी” हिला गडचिरोली पोलीस दालने अटक केली आहे.

“मुडे हिडमा मडावी” ही छत्तिसगडमधील सुकमा जिल्हयातील रहिवाशी असून ती ‘कसनसुर दलम’मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तसेच तिच्यावर महाराष्ट्र सरकारने २ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. एटापल्ली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या केलेल्या नाकाबंदी दरम्यान ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नक्षलवाद्यांकडून दिनांक – २८ जुलै ते ०३ ऑगस्ट दरम्यान शहीद सप्ताह साजरा करण्यात येतो.या दरम्यान
नक्षलवाद्यांकडुन सरकारविरोधात हिंसक कारवाया घडवुन आणल्या जातात. या पार्शवभूमीवर नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षलविरोधी अभियान अतिशय तीव्र पणे राबवली जाते. विशेष म्हणजे मागील आठवड्यात २८ जुलै जुलै च्या रात्री जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या अतिदुर्गम अशा कमलापूर मधून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैैद्यकीय अधिकारी, तसेच रुग्णालयातील दोन रुग्णवाहिका चालक यांना नक्षली बॅनर लावतांना साहित्यासह रंगेहाथ अटक करण्यात आले होते. त्या तीनही संशयित आरोपींना न्यायालयाने आठ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनाविली आहे. त्यानंतर बुधवारी पकडलेल्या जहाल महिला नक्षलवादी मुळे नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाला हे आणखी एक मोठे यश मिळाले आहे.

दरम्यान, दि. ०३/०८/२०२२ रोजी पोलीस उपविभाग एटापल्ली अंतर्गत असलेल्या एटापल्ली पोलीस पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी केली असता, एक महीला संशयीतरित्या मिळुन आली होती. जवानांनी महीला पोलीसांमार्फत तिची अधिक चौकशी केली असता तिने सोबत बाळगलेल्या साहीत्यावरुन ती जहाल महीला नक्षली मुडे हिडमा मडावी कसनसुर दलम सदस्य
असल्याचे समजले. त्यावरुन जवानांनी तिला ताब्यात घेवुन अटक केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदरची कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक      (अभियान). सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  समीर शेख, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

अटक करण्यात आलेली जहाल महीला नक्षली ही कसनसुर दलममध्ये सदस्य पदावर
कार्यरत असुन ती छत्तिसगड राज्यातील सुकमा जिल्हयातील रहीवासी आहे. तिच्या नक्षली
कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने तिचेवर ०२ लक्ष रुपयाचे
बक्षीस जाहीर केले होते. तिचा किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस
दल करीत आहे.

सदरची कारवाई करणाऱ्या जवानांचे पोलीस अधीक्षक  अंकित गोयल यांनी कौतुक केले असुन, नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

Comments are closed.