Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

श्रीनगर परिसरात सुरक्षा दल आणि पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

श्रीनगर येथील अलमगिरी बाजार परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

श्रीनगर डेस्क 6 डिसेंबर :- जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर परिसरात सुरक्षा दल आणि पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. ही घटना श्रीनगरच्या हवल सजगीरपोरा परिसरात घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलीस कर्मचारी आणि नागरिकाला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि पोलीस कर्मचारी यांच्या कुमकवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलानं या परिसराला घेरलं असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षा दल आणि पोलीस यांना एकत्र दहशतवाद्यांनी यावेळी टार्गेट केलं आणि हल्ला केला.

जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलमगिरी बाजार परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला करून लक्ष्य केले. फारूख अहमद असं जखमी झालेल्या पोलीस जवानाचं नाव आहे तर दुसरा नागरिक असून दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन जारी आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.