Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘लोकस्पर्श’ चा दणका, वन कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  

गडचिरोली, दि.२४ नोव्हेंबर: कोणतीही चूक नसतांंना भामरागड वन विभागातील लेखापाल एम. जे. पिल्लीवार यांना भामरागड उपवनसंरक्षकांनी (प्रादेशिक) निलंबित केले होते. त्यावर ‘लोकस्पर्श न्यूज’ ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच गडचिरोली वनवृत्तात खळबळ निर्माण झाली. या वृत्ताच्या दणक्याने एन. आर. प्रवीण, मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांनी लेखापाल पिल्लीवार यांचे निलंबन रद्द करण्याचा आदेश केवळ एका दिवसाचा आत बदलवून २४ नोव्हेंबर रोजी आदेश जारी करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भामरागड वनविभागात उपवनसंरक्षक रजतकुमार हे ऑगस्ट महिन्यात रुजू झाल्यापासून त्यांची कर्मचाऱ्याप्रती बेबंदशाही, अडेलटट॒टू, मनमानी कारभारामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज २४ नोव्हेंबर ला आस्थापना कक्षातले लेखापाल एम. जे. पिल्लीवार यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कारण नसतांना निलंबनाची तडकाफडकी कारवाई करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त लोकस्पर्श न्यूजने प्रकाशित करून लावून धरले होते. त्याच बातमीची दखल घेऊन मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी आस्थापना कक्षातले लेखापाल एम. जे. पिल्लीवर यांचे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ च्या पोट नियम (५) च्या खंड(क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीच्या वापर करून उक्त निलंबन आदेश तात्काळ परिणामाने रद्द करण्यात आले.

भामरागड उपवनसंरक्षकाच्या मनमानी व कर्मचाऱ्यांविरोधी वागणुकीबद्दल व इतर मागण्या संदर्भात मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली यांना निवेदन सादर केले असून तसेच मागण्या मान्य न झाल्यास उद्या २५ नोव्हेंबर ला कार्यालयीन कर्मचारी सामुहिक रजेवर जाणार असल्याचे निवेदनात म्हटले असून भामरागड वन विभागात उपवनसंरक्षकाच्या कार्यप्रणाली बाबत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याने वरिष्ट वनाधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून  वनविभागाचे कामकाज कसे सुरळीत होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भामरागड वनविभागाच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांची कार्याचे आज तक्रार दिली असून त्या तक्रारीची व लोकस्पर्श न्यूजची दखल घेतली आहे. या अगोदरही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपवनसंरक्षक रजतकुमार यांच्या विरुद्ध तक्रार दिली असल्याने त्यांची चौकशीसाठी समितीचे गठन करण्यात आले असून पुढील चौकशी सुरु आहे. याशिवाय रजतकुमार यांनी रजेवर जाण्यासाठी अर्ज दिला असून त्यांच्या रजा मंजूर करण्यात आल्या आहे. तरीही ते कार्यालय मुक्त झाले नसून कार्यालयातच कर्तव्यावर आहेत. त्यांची अधिक चौकशी करून अहवाल पाठविण्यात येईल.

एन. आर. प्रवीण, मुख्य वनसरंक्षक (प्रादेशिक) गडचिरोली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.