Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी । महागाईचा भडका सर्वसामान्यांना घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा झटका

पुन्हा एकदा सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली ६ जुलै :-  पुन्हा एकदा देशात महागाईचा  भडका उडाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात थेट 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजीच्या दरात वाढ केली आहे. मुंबईत आता घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1052.50 रुपये मोजावे लागणार आहेत. Oil Marketing Companies(OMCs) यांनी आज नवीन गॅस दर जाहीर केले आहेत.

राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1053 रुपये, कोलकातामध्ये 1079 रुपये आणि चेन्नईत 1068.50 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या महिन्यात 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत  3.5 रुपयांनी वाढली होती. त्यामुळे एका सिलिंडरची किंमत 1,003 रुपये झाली होती. पूर्वी ती 999.50 रुपये होती. सिलिंडर एक हजार रुपायांच्या पार गेल्यानंतर ही थेट 50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या महिन्यातील सिलिंडरच्या किमतीतील दोनवेळा वाढ करण्यात आली होती. देशभरातील एलपीजी दर  1,000 रुपयांच्या वर पोहोचले. 22 मार्च रोजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी आणि 7 मे रोजी पुन्हा त्याच प्रमाणात वाढ करण्यात आली.
एप्रिल 2021 पासून सिलिंडरच्या किमती 193.5 रुपयांनी वाढल्या आहेत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.