Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रुग्णालयाला भीषण आग, आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेश जबलपुरमध्ये खासगी रुग्णालयातील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

  1 ऑगस्ट  जबलपुर:-

मध्य प्रदेशच्या जबलपुरमध्ये एका खासगी रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहे. जबलपूरमधील दमोह नाका शिवनगर स्थित न्यू लाईफ मल्टीस्पेशलिटी रुग्णालयाला ही आग लागली आहे. आगीतील मृतांमध्ये सर्वाधिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र रुग्णालयाचे या आगीत सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी घटनेवर ट्विट करत म्हटले की, या आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 – 5 लाखांची आर्थिक मदत दिली जाईल, तर दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 – 50 हजारांची आर्थिक मदत दिली जाईल, तसेच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च राज्य सरकार करेल.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

NIAची देशभरात मोठी कारवाई. https://loksparsh.com/national/nias-massive-action-across-the-country-raids-at-13-locations-in-6-states-including-nanded-and-kolhapur-in-maharashtra-suspects-arrested-from-nanded-kolhapur/28190/

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.