Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

क्राईम ब्रांचचा अधिकारी भासवून तरुणाला लाखोचा गंडा; आरोपी अटकेत

मानपाडा पोलिसाची कारवाई....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

डोंबिवली : क्राईम ब्रांचचा अधिकारी असल्याचे भासवून एका तरुणाकडून लाखोची खंडणी उकळणाऱ्या तुषार शीलवंत या तरुणाला मानपाडा पोलिसांनी कल्याणात सापळा रचून अटक केली आहे. पाच लाख रुपयाची खंडणी उकळल्यानंतर त्याच्याकडे आणखी १० लाख रुपयाची खंडणी त्याने मागितल्या नंतर याप्रकरणी तरुणाने मानपाडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. गुरुवारी सकाळी खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या तुषारला दुर्गाडी किल्ल्याजवळ पोलिसांनी सापळा रचून अटक केल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली.

डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात राहणाऱ्या शंकर परब या तरुणाचे सागर्ली जिमखाना रोड येथील एका बिल्डींग मध्ये ऑफिस आहे. ७ एप्रिल रोजी या ऑफिसमध्ये चार चाकी गाडीने आलेल्या तुषार नावाच्या एका व्यक्तीने आपण वाशी येथील क्राईम ब्रांच मध्ये पोलीस असून आपल्याकडे जानवी नावाच्या तरुणीची तक्रार आल्याचे सांगितले तसेच या तक्रारीवरून शंकर विरोधात कोणतीही कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयाची मागणी केली. त्यातील दोन लाख त्याचवेळी घेतले तर दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन लाख आणि तिसऱ्या दिवशी ९ एप्रिल रोजी १ लाख रुपये घेतले. एवढ्यावरच न थांबता त्याने १ मे पासून १२ मे पर्यत शंकरला पुन्हा पुन्हा व्हाट्सअप कॉल करून आणखी १० लाख रुपयाची मागणी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यामुळे त्रासलेल्या शंकर यांनी १२ मे रोजी संबधित इसमा विरोधात मानपाडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. १३ मे रोजी सकाळी हि खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी तुषार याने शंकरला दुर्गाडी किल्ल्याजवळ बोलावले होते. हि खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या तुषारला मानपाडा पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेत अटक केली असल्याचे डोंबिवलीचे एसीपी जय मोरे यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती

धुळ्यात १ कोटी ३७ लाखांचा गुटखा जप्त, तीन संशयित ताब्यात

 

Comments are closed.