Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुकेश अंबानी यांची कोल्ड ड्रिंकच्या क्षेत्रात उडी

पेप्सी अन् कोका कोलाची उडवली झोप,

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी उद्योगाचा विस्तार अनेक क्षेत्रात केला आहे. कोल्ड ड्रिंकच्या क्षेत्रात मुकेश अंबानी यांनी काही वर्षांपूर्वी प्रवेश केला असून  या क्षेत्रातील जुनी कंपनी असलेल्या  कॅम्पा कोलाचे त्यांनी अधिग्रहण केले होते. त्यानंतर मार्केटमध्ये प्रॉडक्ट रिलॉन्च केले आहे. कॅम्पा कोलाची कमी किंमत आणि मार्केटिंग स्ट्रेटेजीमुळे पेप्सिको आणि कोका कोला या कंपन्यांची झोप उडली आहे.

कॅम्पा कोला देशातील लोकल ब्रँड आहे. त्याची सुरुवात 1970 च्या दशकात झाली . त्यानंतर हा ब्रँड घराघरात पोहचला होता. त्यानंतर 1990 च्या दशकात विदेशी कंपनी पेप्सिकोची पेप्सी आणि कोका कोला कंपनीचे कोक मार्केटमध्ये आले. त्यानंतर कॅम्पा कोला या दोन्ही कंपन्यांचे आव्हान पेलू शकली नाही.  वर्ष  2022 मध्ये मुकेश अंबानी यांनी कॅम्पा कोला कंपनीस 22 कोटीत विकत घेतले होते.

मुकेश अंबानी कॅम्पा कोला रिटेलर्सला जास्त  कमिशन  देत आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्त दुकानात पोहचत आहे. रिटेलर्सला कॅम्पा कोलासाठी 6-8% मार्जिन आहे तर इतर कंपन्या 3.5 ते 5% मार्जिन देत आहे.

किंमतीवरुन कॅम्पा कोला कंपनीने  पेप्सी आणि कोका कोला यांना जेरीस आणले आहे. कॅम्पा कोलाच्या 200 मिलीच्या बॉटलची किंमत 10 रुपये ठेवली आहे. त्यानंतर कोका कोला आणि पेप्सिकोने त्यांच्या 250 मिली कोल्ड ड्रिंकची किंमत 20 रुपये ठेवली आहे. आता त्यांना कॅम्पा कोलामुळे बसत असलेल्या फटक्यामुळे या कंपन्या किंमत कमी करण्याचा विचार करत आहेत.त्यामुळे आता कोल्ड ड्रिंकमध्ये प्राइस वॉर दिसण्याची शक्यता आहे.

रिलायन्स कंपनी  स्नॅक्स प्रॉडक्ट्ससुद्धा मार्केटमध्ये उतरण्याची तयारी करत आहे.रिलायन्स चिप्स, नमकीन आणी बिस्कुट आणण्याची तयारी करत आहे.  पेप्सिको आणि कोका कोला कंपन्या काही स्नॅक्स विकतात. त्यात पेप्सिकोच्या स्नॅक्सची संख्या जास्त आहे. लेज चिप्स, कुरकुरे हे त्यांचे प्रमुख प्रॉडक्ट आहे. यामुळे कोल्ड ड्रिक्स वॉर आता स्नॅक्स वॉरमध्ये बदलणार आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.