Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल्यांचा प्रमुख नेता गिरीधरचे पत्नी संगीतासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 22 जुन – गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीतील राजकीय आणि लष्करी हालचालींचा प्रभारी आणि वरिष्ठ नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू याने आज पत्नी संगीता हिच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

१९९६ मध्ये नक्षल चळवळीत भरती झालेल्या गिरीधरने विविध दलममध्ये काम केल्यानंतर विभागीय समिती सदस्य, कंपनी क्रमांक चारचा कमांडर, दंडकारण्य स्पेशल झोनल समिती सदस्य, कंपनी क्रमांक १० चा प्रभारी तसेच दक्षिण गडचिरोली विभागीय समितीचा सचिव म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गिरीधरची पत्नी संगीता उर्फ ललीता चैतू उसेंडी ही २००६ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाली. २०११ ते मे २०२० पर्यंत ती छत्तीसगडमधील माड दलममध्ये कार्यरत राहिली. त्यानंतर जून २०२० पासून ती भामरागड दलममध्ये विभागीय समिती सदस्य होती. महाराष्ट्र शासनाने तिच्यावर १६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाचे पुस्तक, शाल आणि श्रीफळ देऊन दोघांचाही सत्कार केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्षली संविधानाला मानत नाही म्हणून आमचा विरोध: देवेंद्र फडणवीस

नक्षलवाद्यांचा संविधानावर विश्वास नाही. ते हिंसेवर विश्वास ठेवून निरपराध नागरिकांचा बळी घेतात. त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. पोलिसांनी सोशल पोलिसींगद्वारे शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिल्याने दुर्गम भागातील आदिवासींना नक्षल्यांपेक्षा पोलिस जवळचे वाटतात. म्हणून आत्मसमर्पण करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गिरीधर हा मोठा नक्षल नेता मुख्य प्रवाहात आल्याने नक्षल चळवळ जवळपास संपली आहे, असे फडणवीस म्हणाले. कार्यक्रमाला आ.कृष्णा गजबे, आ.डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय दैने, माजी खासदार अशोक नेते, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.