Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विरोधक कितीही गोंधळ घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाही – जयंत पाटील

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. २ मार्च विरोधक कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो असे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज ठणकावून सांगितले.

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचा इरादा स्पष्ट केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप भाजप करत राजीनाम्याची मागणी करत आहेत. खोटे – नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल पण ते नेहमीप्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. मात्र विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात असे आवाहनही जयंत पाटील यांनी विरोधकांना केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते.नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली असेही जयंत पाटील म्हणाले.

नवाब मलिक यांच्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आढावा बैठक आदरणीय अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली आहे. यामध्ये अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा केली जाईल. संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावर महाविकास आघाडीची चर्चा होईल असेही जयंत पाटील म्हणाले.

हे देखील वाचा : 

गडचिरोलीतील इयत्ता 1 ली ते 3 री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी या विषयाच्या गोंडी व माडीया भाषेतील पाठयपुस्तकांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रकाशन

एकल केंद्र, गडचिरोली गौण वनोपज आधारित प्रकल्पाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोलीतील इयत्ता 1 ली ते 3 री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी या विषयाच्या गोंडी व माडीया भाषेतील पाठयपुस्तकांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रकाशन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.