Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारत समजू शकतो आणि समजावूही शकतो.आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जैसलरमेर, राजस्थानः भारताच्या जवानांनी १०७१ च्या युद्धा पराक्रमाची शौर्यगाथा रचलेल्या जैसलमेरमधील लोंगेवालाच्या पोस्ट पंतप्रधान मोदींनी चीन, पाकिस्तानला ठणकावलं आहे. भारत आज समजण्यात आणि समजावण्याच्या नितीवर विश्वास ठेवतो. आणि कुणी जर आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तरही प्रचंडच मिळेल, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जैसलमेरच्या लोंगेवालामध्ये पंतप्रधान मोदी जवानांसोबत यंदा आपली दिवाळी साजरी करत आहेत. पंतप्रधान मोदींनी यावेळी जवानांना संबोधित केलं. भारताचं धोरण आता पक्क आहे. भारत समजू शकतो आणि समजावूही शकतो. या रणनितीवर देशाचा विश्वास आहे, असं सांगत पंतप्रधान मोदींनी चीन आणि पाकिस्तानला ठणकावलं.

पंतप्रधान मोदींनी नाव न घेता चीनला लक्ष्य केलं. आपण समजू शकतो आणि वेळ पडल्यास समजावूही शकतो. आपल्या ताकदीला आव्हान देण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला उत्तरही प्रचंड मिळेल, असं मोदी म्हणाले. आज संपूर्ण जग साम्राज्यवादी शक्तींमुळे चिंतेत आहे. साम्राज्यवाद एक मानसिक विकृती आहे. १८ व्या शतकातील मागास विचार त्यातून दिसून येतो. या विचाराविरोधात भारत एक प्रखर आवाज बनत आहे, असं म्हणत मोदींनी चीनवर निशाणा साधला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.