Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘संविधान उद्देशिका’ आता आदिम माडिया भाषेत

नक्षल प्रभावित दुर्गम भागात संविधानाबाबत जनजागृती; युवकांचा पुढाकार..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर,

गडचिरोली दि,२ एप्रिल : गडचिरोलीतील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भामरागड, एटापल्ली, अहेरी, धानोरा व छत्तीसगड सीमावर्ती भागात आदिम माडिया समाज आहे. मागील वर्षी पाथ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ९४ टक्के माडिया समाज बांधवांनी ‘संविधान’ हा शब्दच ऐकला नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले होते. ही बाब लक्षात घेत भारतीय संविधान उद्देशिकेचा स्थानिक आदिम माडिया भाषेत समाजातील पहिले वकील अॅड . लालसू नोगोटी, सामाजिक कार्यकर्ते चित्रा महाका व अविनाश पोईनकर यांनी अनुवाद केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली भागातील या माडिया समाजातील समाज बांधवांची लिपी देवनागरी असली तरी बोलीभाषा स्वतंत्र आहे. शिवाय, समाजाची संस्कृतीही वेगळी आहे. देशभरातील ७५ व राज्यातील एकूण ३ आदिम समुदायांपैकी जल-जंगल-जमिनीवर उपजीविका करणारा हा एक समुदाय. शिक्षणाची कमी, जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक तर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही मूलभूत गरजांचीच पुर्तता अद्याप होऊ शकलेली नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अशा या भागात भारतीय संविधानच पोहोचले नसल्यास यापेक्षा धक्कादायक काय असू शकते. संविधान उद्देशिका म्हणजे संविधानाच्या प्रतीचा सार आहे. त्यामुळे, या उद्देशीकेच्या माध्यमातून नक्षल प्रभावित या भागात संविधानाबाबत जनजागृती करण्याचा एक सकारात्मक अन् प्रामाणिक प्रयत्न केला जातो आहे.

माडिया समाजामध्ये या संविधान उद्देशिकेच्या माध्यमातून झाल्यास संविधानाबाबत जनजागृती निर्माण हक्काबाबत, संविधान तळागाळात- घराघरांत पोहोचवणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. संविधानाचे पाईक म्हणून या भागात संविधान जनजागृतीचे प्रयत्न गरजेचे आहे. माडिया समाजाला आपल्या मातृभाषेत उद्देशिका कळावी अन् त्यातून जनजागृती करता यावी म्हणून आम्ही हा अनुवाद केला आहे. 

अॅड. लालसू नोगोटी
अनुवादाबाबत प्रशासन अनभिज्ञ!

संविधान म्हणजे काय, हे समजावून सांगण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगडच्या दुर्गम भागामध्ये प्रशासन गेली अनेक दशके प्रयत्न करीत आहे. संविधान उद्देशिकेचा आजवर अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. मात्र, आदीम अन् त्यातल्या त्यात नक्षल प्रभावित भागातील या माडिया भाषेत संविधान उद्देशिकेचा अनुवाद झाला असल्याने त्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशासन या अनुवादाबाबत संध्या अनभिज्ञ असले तरी या राष्ट्रीय कार्याची लवकरच दखल घेईल, अशी अपेक्षा आहे.

देशाचे संविधान पोहोचवणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. संविधानाचे पाईक म्हणून या भागात संविधान जनजागृतीचे प्रयत्न गरजेचे आहे. माडिया समाजाला आपल्या मातृभाषेत उद्देशिका कळावी. त्यातून जनजागृती करता यावी म्हणून आम्ही हा अनुवाद केला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अॅड. लालसू नोगोटी, चिन्ना महाका, अविनाश पोईनकर यांनी सांगितले..

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.