Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे,  सरकारने यांना वेळीच ठेचल पाहिजे – राज ठाकरे यांचा हल्लाबोल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, दि. २३ सप्टेंबर – एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे.

ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली…! थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत. असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज ठाकरे पुढे म्हणाले की, माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील ( पा ) उच्चारता येणार नाही !

नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ही याप्रकरणी आपली प्रतिक्रिया माध्यमाकडे दिलीं आहे.

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यावर कडक कारवाई करा! असे नाना पटोले म्हणाले,’ UAPA कायद्याने PFI सारख्या संघटनेवर बंदी घालण्याचे अधिकार केंद्राला आहेत, मग केंद्र सरकार अशा संघटनावर बंदी का घालत नाही. कोणतीही संघटना धार्मिक उन्माद घालत असेल तर त्यावर बंदी ही घातलीच पाहिजे असेही नाना पटोले पुढे म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.