Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सांगलीचे सुपुत्र संभाजी गुरव यांनी गाठलं सर्वोच माऊंट एव्हरेस्ट शिखर; पहिले मराठी पोलीस अधिकारी ठरले एव्हरेस्टवीर

नवी मुंबई पोलीस आयुक्तलय येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सांगलीचे सुपुत्र संभाजी गुरव यांनी जगातील सर्वोच्च शिखर "माऊंट एव्हरेस्ट" सर केले आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली : सांगलीचे सुपुत्र व मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करून मुंबई पोलीस दलाचा झेंडा फडकवला आहे. गुरव हे वाळवा तालुक्यातील पडवळवाडीचे पुत्र आहेत. त्यामुळे सांगलीच्याही शिरपेचात गुरव यांच्या कामगिरीने मानाचा तुरा रोवला गेला आहे.

              संभाजी गुरव – मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट पायाखाली घेणारे ते पहिले मराठी पोलीस अधिकारी ठरले आहेत. शिवाय सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलेच एव्हरेस्टवीर असा पराक्रम त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मूळचे पडळवळवाडीचे सुपुत्र असणारे संभाजी गुरव हे मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरव यांना पहिल्यापासून गिर्यारोहणाची आवड आहे, पोलीस दलात भरती होण्यापूर्वी त्यांनी गिर्यारोहनाचे धडे घेतले आहेत. पोलीस दलात भरती झाल्यानंतरही गुरव यांचा गिर्यारोहणाच्या छंद कायम होता, एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे ध्येय बाळगून गुरव यांनी अथक प्रयत्न सुरू ठेवले होते. यातूनच एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक क्षमता तपासणीसाठी एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेनिंग देखील पूर्ण केलं होतं. त्यानंतर त्यांना एव्हरेस्ट शिखर खुणावत होते.

१४ मे २०२१ पासून संभाजी गुरव यांनी काठमांडू येथून एव्हरेस्ट शिखर सर करण्याची मोहीम सुरु केली. ६५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत १७ मे रोजी बेस कॅम्प २ याठिकाणी पोहचले, त्यानंतर १८ मे रोजी बेस कॅम्प ३, १९ मे रोजी बेस कॅम्प ४ आणि त्यानंतर २० मे पासून प्रत्यक्ष एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी चढाई सुरू झाली. निसर्गाची साथ आणि पोषक वातावरण यामुळे संभाजी गुरूव यांनी २२ मे रोजी अखेर एव्हरेस्ट शिखर सर करत महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा फडकवत, मुंबई पोलीस दलाबरोबर सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हा सर्व प्रवास त्यांनी उणे १९ अंश सेल्सिअस तापमानाच्या वातावरणात पूर्ण केला. त्यामुळे आता संभाजी गुरव यांचे नाव गिर्यारोहकांच्या यादीत सुवर्ण अक्षरांना नोंद झाले आहे.

हे देखील वाचा :

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय , पोलीस अधीक्षक कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी.

बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड

 

 

Comments are closed.