Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना रुग्णाला दारू दिल्यास तो बरा होतो, असा दावा करणाऱ्या “त्या” अहमदनगरच्या डॉक्टरने घेतली माघार !

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

 देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाने चांगलाच थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेचा प्रकोपाचा सर्वांनाच सामना करण्याची वेळ आली आहे. देशभरात दररोज तीन लांखांहून अधिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. त्यासाठी प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप आटोक्यात आणण्यासाठी विविध युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गावर अद्याप औषध उपलब्ध झालेले नाही.

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींद्वारे प्रशासनाने लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी एका बाजूने रेमडेसिव्हीर आणि इतर औषधांची कमतरता जाणवतं असतांना विविध उपाय योजना केल्या जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अशा परिस्थितीतही कोरोना रूग्णांना बरे करण्यासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगावचे डॉ. अरुण भिसे यांनी अजब फंडा वापरला आहे. कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यास तो बरा होता, असा दावा डॉ. अरुण भिसे यांनी केला होता. त्यानंतर समाजात उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.

मात्र अचानकच असा दावा करणाऱ्या ह्या डॉक्टर भिसे यांनी माघार घेऊन फक्त देशी दारूने करोना बरा होता, असा आपला दावा नाही. आपण केवळ आपला अनुभव सांगितला आहे. यात माझी कोणाचीही दिशाभूल करण्याचा आपला उद्देश नसून तथापि आपण आपली यासंबंधीची केलेली पोस्ट मागे घेत आहे. जेव्हापासून टास्क फोर्सने मान्यता देईपर्यंत कोणीही देशी दारूचा प्रयोग करू नये,’ असे म्हंटले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर केलेल्या दाव्याची चर्चा होताच प्रशासनाकडून आलेल्या चौकशीच्या नोटिसीला त्यांनी उत्तर दिले असून संबंधित पोस्टही मागे घेतली आहे. ‘यानंतरही कोणी असा उपचार केला, तर होणाऱ्या परिणामांना तुम्हीच जबाबदार राहाल,’ असा इशाराही त्यांनी नागरिकांना दिला आहे.

तीन दिवसांपूर्वी डॉ. भिसे यांनी एक पोस्ट लिहून करोना रुग्णाला काही दिवस दररोज ६० मिलीलीटर देशी दारू पाजल्यास कोरोना लवकर बरा होता असा दावा करण्यात आला होता. आपण हा प्रयोग ५० रुग्णांवर केल्याचेही त्यांनी नमूद केले होते. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध समाजमाध्यमांच्या प्रतिक्रिया उमटल्या. आरोग्य विभाग आणि प्रशासनानेही याची दखल घेऊन डॉ. भिसे यांना नोटीस पाठविली आणि उत्तर मागितले त्यावेळी या नोटिशीला डॉ. भिसे यांनी उत्तर दिले आहे.

डॉ. भिसे यांनी म्हटले आहे की, ‘देशी दारूमुळे कोरोना बरा होतो, असा दावा आपण केलेला नाही. नेहमीची ॲलोपॅथिक औषधे आणि प्रमाणित मात्रेत अल्कोहोल सेवन केल्यास कोरोना रुग्ण बरा होतो, असा माझा अनुभव कथन केला आहे.

भिसे यांनी सोशल मीडियातील आपली मूळ पोस्ट काढून टाकली असून आणखी एक नवी पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘आपण सर्वांना सांगू इच्छीतो की मी फक्त देशी दारूने कोरोना बरा होतो, असा दावा केलेला नाही.

ज्या रुग्णांवर मी उपचार केला, त्यांच्यावर सरकारने प्रमाणित करून दिलेले उपचारही सुरू केले होते. कोरोनावर उपचार म्हणून अल्कोहोलचा वापर करण्यास तज्ज्ञांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे कोणीही आपल्या रुग्णाला माझ्या त्या लिहिलेल्या पोस्टप्रमाणे अल्कोहोल देऊ नये. त्यासाठी कोविड टास्क फोर्सची परवानगी आवश्यक असून ती मिळविण्यासाठी मी प्रयत्न करीन.

माझ्या केलेल्या पोस्टचा गैरअर्थ काढून कोणी अपप्रचार करून व्यसनाचे किंवा दारूचे समर्थन करू नये. डॉक्टरांचा सल्ला न घेता चुकीचा उपचार स्वत:च्या मनाने केला तर होणाऱ्या परिणामाला तुम्ही स्वत: जबाबदार असाल, याची नोंद घ्यावी,’ असेही डॉ. भिसे यांनी म्हटले आहे.

दरम्यान डॉ. अरुण भिसे यांनी आतापर्यंत 40 ते 50 जणांना दारु घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी तो मान्य केल्याची माहिती भिसे यांनी दिली. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणि दारुचं औषधी प्रमाण घेण्यास सांगतिलं.

त्याप्रमाणं 40 ते 50 पेशंट बरे झाले आहेत. त्यापैकी 10 रुग्ण गंभीर होते, ते बरे झाले, आतापर्यंत एकाचाही मृत्यू झाला नाही, असं अरुण भिसे यांनी सांगितलं आहे. डॉ. अरुण भिसे यांच्या दाव्याची समाज माध्यमांवर केलेल्या दाव्यामुळे विविध चर्चेला उधान आले आहे.

हे देखील वाचा : 

धुळ्यात १ कोटी ३७ लाखांचा गुटखा जप्त, तीन संशयित ताब्यात

दोन जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.