मुंबईच्या समुद्रात एलिफंटला जाणारी बोट उलटली
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई : आज दि. १८ डिसेंबर रोजी मुंबईतील गेट ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात प्रवासी बोट उलतून घटनेत ७७ प्रवासी सुखरूप असून तीन प्रवासाच्या मृत्तू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबईत रोज हजारो पर्यटक गेट ऑफ इंडिया पाहण्यासाठी येत असतात. त्यातील काही पर्यटक गेट ऑफ इंडिया पहिल्यानंतर एलिफंटा येथील गुफा पाहण्यासाठी जात असतात. एलिफंटाला जाण्यासाठी पर्यटकांना प्रवासी बोटीने प्रवास करावा लागतो. बुधवारी दुपारी पर्यटकांनी भरलेल्या दोन बोटी एलिफंटा येथील गुफा पाहण्यासाठी निघाल्या होत्या. त्यानंतर या दोन बोटींमध्ये टक्कर झाली. त्यानंतर नीलकमल नावाची बोट समुद्रात उलटली.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रातून दोन बोटी एलिफंटाच्या दिशाने निघाल्या होत्या. त्यानंतर दोन बोटींमध्ये धडक होऊन नीलकमल नावाची बोट उलटली सदरची घटना बुधवारी दुपारी घडली. या बोटीमध्ये 80 प्रवासी प्रवास करीत होते. प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यात आलेले होते. घटनेची माहिती तात्काळ उरण, कारंजा पोलिसांनी दिली. असल्याने त्यानंतर नेव्ही, जेएनपीटी, कोस्टगार्ड, पोलिसांच्या आणि स्थानिक माछीमारांच्या बोटीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील इतर बोटी घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी बचावकार्य सुरु करून ७७ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलेले असून ३ प्रवाशाचा मृत्त्यू झाल्याची माहिती मिळाली.
हे पण पहा,
Comments are closed.