Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रानटी डुक्करची शिकार करणारे दोन आरोपी गजाआड

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

रायगड, दि. ३ फेब्रुवारी : श्रीवर्धन तालुक्यात अनधिकृतपणे रानटी डुकराची शिकार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलिसांनी गु र न ०५/२०२२ भारताचा हत्यार अधिनियम १९५९ चे कलम ३, २५  सह वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम २ (१६), ९ ५०, ५१ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

मुंबई कांदिवली येथे राहणारे चार्ली अंथॉनी वैती (४०) ग्लेन डोमीनीक वैती (३९) या आरोपीना अटक केली असून आरोपीना न्यायालयात हजर केली असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर आरोपींकडून एक दोन नळी बारा बोर बंदूक पंधरा काडतुसे एक झायलो कार ३५ किलो रानटी डुकराचे मटण असे एकूण ४ लाख ५२  हजार २९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आल्हाट करत आहेत.

सदर गुन्हा दाखल झाल्यामुळे वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या शौकीनांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा तारा निखळला

शेंडीच्या डोंगरावर चढलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू तर एक जखमी

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.