Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

4 देशात शक्तीशाली भूकंपाने, 1700 हून अधिक मृत्यू

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 एवढी नोंदवली

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

Turkey-Syria Earthquake:- चार देशांना लागोपाठ तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. यात तुर्की, सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल या देशांचा समावेश आहे. या चारही देशात मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जिवीतहानी झाली आहे. भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान तुर्कीचे झाले असून या एका देशातच मृतांची आकडेवारी 1 हजाराच्या वर आहे. आतापर्यंत 5 हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 तुर्कीमध्येही पहाटे 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्याची डेप्ट ही 18 किमीची होती. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. गाझियनटेप हे भूकंपस्थानापासून सीरिया हा देशही जवळ आहे. त्यामुळे या भूकंपाची तीव्रता तुर्की आणि सीरियामध्ये जाणवली असून त्यामध्ये आतापर्यंत 1400 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. . भूकंपांच्या घटनांमुळे अनेक मोठ्या इमारती क्षणात ध्वस्त झाल्या आहेत. या ढासळलेल्या इमारतींमध्ये शेकडो लोक दबल्याची शक्यता आहे. या दोन्ही देशांमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य केले जात आहे.

तुर्कीवर ओढावलेल्या संकटानंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीतील भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच भारत सरकार मदतीसाठी साहित्यासह एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके बचावकार्यासाठी तुर्कीला पाठवत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

 

 

 

Comments are closed.