Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

..पुन्हा सोन्या चांदीचा दर वधारला! एकाच दिवसात सोनं 1000 तर चांदी तब्बल 4400 रुपयांनी महाग 

0
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
विशेष प्रतिनिधी, प्रकाश थूल.
अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचा परिणाम म्हणून काल चांदीच्या दरात एकाच दिवसात 4400 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं सध्या चांदीचा दर हा 87 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर सोन्याच्या भावातही 1 हजार रुपयांची वाढ झाली असून सोने 73 हजार 900 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी दरवाढ झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई : सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. यामुळं सामान्य ग्राहकांच्या खिशावर मोठा परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, काल (13 सप्टेंबर) चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काल एकाच दिवसात बुलढाणा  जिल्ह्यातील खामगाव येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत चांदीच्या दरात  तब्बल 4400 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आलं आहे.

चांदीचा दर हा 87 हजार रुपये प्रति किलोवर

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचा परिणाम म्हणून काल चांदीच्या दरात एकाच दिवसात 4400 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं सध्या चांदीचा दर हा 87 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर सोन्याच्या भावातही 1 हजार रुपयांची वाढ झाली असून सोने 73 हजार 900 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी दरवाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार सुरू असलेल्या सोन्या-चांदीच्या भावात काल मोठी वाढ झाल्याचे दिसून आली आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून बँकांचे व्याजदर आणखी कमी होण्याचे संकेतही तज्ञांनी दिले आहेत.

हे देखील वाचा,

लॉयड्स मेटल्स आणि एनर्जी लिमिटेडने गडचिरोली जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

कॉम्रेड सिताराम येचुरी यांना अभिवादन

Leave A Reply

Your email address will not be published.