Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जंगलातील वणवा तापमान वाढीस घातक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. ८ एप्रिल: जनतेच्या भल्यासाठी शासन विविध योजना राबवित असते पण काही लोकांना त्या पचत नाही. झाडे लावा- झाडे जगवा या योजनेसाठी करोडो रुपये खर्च शासन करत असते. जंगलाच्या रखवाली करिता वनविभाग सर्वतोपरी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत असते पण अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे त्यांच्यावर पडणाऱ्या ताणामुळे तेही गुडघे टेकतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्वार्थी माणूस मोहफुले वेचण्यासाठी मोहाच्या झाडाखाली आग लावतात. तेंदुपत्ता संकल्पना करीता टेंभुरणच्या झाडाला चांगली पालवी फुटेल या अपेक्षेने आग लावतात. या लावलेल्या आगीमुळे वन्यप्राणी गावाजवळ येऊन राहत आहेत तर काहींची जळून राख रांगोळी होते आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तापमानात खूपच वाढ झाली आहे. जनता या उकाड्याने हैराण झाली आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात धूसर वतावरण पहायला मिळत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.