लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बंग दांपत्याने गडचिरोली जिल्ह्यात ‘सर्च’ संस्थेच्या माध्यमातून गेल्या 38 वर्षात लाखो रुग्णांना वैद्यकीय सेवा, जागतिक मान्यता मिळालेले आरोग्य संशोधन, दारू व तंबाखू कमी करण्यासाठी मुक्तिपथ हा जिल्हाव्यापी कार्यक्रम, युवांसाठी निर्माण व तारुण्यभान हे कार्यक्रम केले आहेत.
बालमृत्यू कमी करण्याची त्यांनी शोधलेली नवी पध्दत –घरोघरी नवजात बालसेवा ही जगात प्रथम असून आता भारत सरकार द्वारे ‘आशा’ योजनेद्वारे पूर्ण भारतात दिली जाते. गेल्या वर्षी भारतातील दीड कोटी नवजात बालकांना त्या पध्दतीने आरोग्य सेवा देण्यात आली.
डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना या पूर्वी महाराष्ट्र भूषण व पद्मश्री सन्मान प्राप्त असून जवळपास सत्तर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘टाइम’ मॅगझिन (अमेरिका) ने त्यांना ‘ग्लोबल हेल्थ हीरो’ म्हणून 2005 मध्ये सन्मानित केले, तर द लॅन्सेट ने त्यांना ‘द पायोनिअर्स इन रूरल हेल्थ केअर’ म्हणून गौरविले आहे.
हे देखील वाचा,
प्राईम लोकेशन वरील प्लॉट दाखवून प्लॉट खरेदीदारांना लुटणारी आली टोळी
Comments are closed.