Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पश्चिम बंगालच्या राजकरणात खळबळ; माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींचा भाजपमध्ये प्रवेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. ६ मार्च: निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ सुरू झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीच्या 76 नेत्यांनी थेट भाजप नेत्यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांना आणखी एक झटका बसला आहे. ममता दीदींचे विश्वासू सहकारी आणि, माजी रेल्वे मंत्री, माजी खासदार दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ममता बॅनर्जींसाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत माजी खासदार दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. सकाळपासूनच त्रिवेदी यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्याने टीएमसीच्या तंबूत प्रचंड खळबळ उडाली होती. त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन एकट्यानेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्रिवेदी यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्रिवेदी हे तृणमूलचे राज्यसभा सदस्य होते. विशेष म्हणजे संसदेचं कामकाज सुरू असतानाच त्यांनी राजीनामा दिला होता. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खासदाराने संसदेचं कामकाज सुरू असताना राजीनामा दिला होता. पक्षात जीव गुदमरत असल्यानेच आपण राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

2011मध्ये ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्रीपद सोडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी त्रिवेदी यांना रेल्वेमंत्री केलं होतं. त्यावरून त्रिवेदी हे ममता दीदींचे अत्यंत जवळचे असल्याचं स्पष्ट होतं आहे.

त्रिवेदींच्या प्रवेशावेळी नड्डा म्हणाले की, “(त्रिवेदी हे) चुकीच्या पक्षातील योग्य व्यक्ती होते. आता ते योग्य पक्षात आले आहेत.” तर दिनेश त्रिवेदी यांनी यावेळी ममता बॅनर्जींना टोला लगावत असे वक्तव्य केले की, ” मी विधानसभा निवडणूक लाढवो किंवा न लाढवो, मी बंगालच्या राजकारणात सक्रिय राहणार आहे.जनतेने तृणमूल काँग्रेसला नाकारलं आहे. जनतेला विकास हवाय, त्यांना भ्रष्टाचार आणि हिंसाचार नकोय. बंगाल खऱ्या परिवर्तनासाठी तयार आहे. राजकारण हा काही खेळ नाही, हा गंभीर विषय आहे. त्या (ममता बॅनर्जी) स्वतःचीच तत्व विसरल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.