Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“गर्लफ्रेंड भाड्याने मिळेल, रोमँटिक डेटपासून ते शॉपिंग, कुकिंगपर्यंत सर्व गोष्टींसाठी एक रेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

 03 जुन 2024-  तुम्ही रोमँटिक डेटसाठी गर्लफ्रेंड भाड्याने मिळते हे कधी ऐकलं आहे का? तुम्हाला हे वाचून हसू येईल,पण परदेशात नाही तर आपल्या देशात असे घडत आहे. दिल्लीतील एका तरुणीने इन्स्टाग्रावर गर्लफ्रेंड भाड्याने मिळेल अशी जाहिरात केली आहे, ज्यात तिने वेगवेगळ्या पद्धतींच्या डेटसाठी रेट लिस्ट ऑफर दिली आहे. यात अगदी रोमँटिक डेटपासून ते शॉपिंग, कुकिंगपर्यंत सर्व गोष्टींसाठी एक रेट देण्यात आला आहे. तरुणीची ही पोस्ट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दिव्या गिरी (@divya_giri__) नावाच्या तरुणीने इन्स्टाग्रामवर याबाबत एक रील पोस्ट केली आहे, ज्यात तिने १५०० रुपयांपासून १०,००० रुपयांपर्यंतच्या स्कीम ऑफर केल्या आहेत. दिव्याने यावर कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही सिंगल आहात? पण एखाद्या मुलीबरोबर डेटवर जाण्याची इच्छा आहे? तर मला डेटवर घेऊन चला, पण त्यासाठी तुम्हाला फक्त भाडे द्यावे लागेल.”

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

https://www.instagram.com/reel/C7b0NwEJQZu/?utm_source=ig_web_copy_link

दिव्याने याबरोबर एक रेट लिस्ट शेअर केली आहे, त्यानुसार एका चिल कॉफी डेटसाठी तुम्हाला १५०० रुपये मोजावे लागतील. सामान्य डेटसाठी डिनर आणि मूव्ही तुम्हाला दोन हजार रुपये द्यावे लागतील. मीटिंग विथ फॅमिलीसाठी तुम्हाला तीन हजार रुपये द्यावे लागतील. कोणत्याही कार्यक्रमात तिला बरोबर घेऊन जायचे असेल तर ३५०० रु. बाईक डेटसाठी (हात पकडणे आणि इतर.) ४००० रुपये भाडं द्याव लागेल. तुम्ही सोशल मीडियावर तिच्याबरोबरच्या डेटचे फोटो पोस्ट केले तर तुम्हाला ६००० रुपये द्यावे लागतील. एडवेंचर डेटसाठी ५००० रुपये, घरी एकत्र स्वयंपाक करण्यासाठी ३५०० रुपये, शॉपिंगसाठी ४५०० रुपये आणि वीकेंडला दोन दिवस एकत्र बाहेर जाण्यासाठी १०,००० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.