Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मी एक लैला आहे आणि माझे हजारो मजनू आहेत- ओवेसी

Get real time updates directly on you device, subscribe now.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पलटवार केला आहे.

हैदराबादमध्ये पूर आलेला असतानाही भाजपने जनतेकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी लावला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हैदराबाद डेस्क ३० नोव्हेंबर :- ‘मी एक लैला आहे आणि माझे हजारो मजनू आहेत’, असे वक्तव्य एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. एआयएमआयएम ही भाजपची बी टीम आहे असा आरोप त्यांच्या पक्षावर लावण्यात येतो. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. माझा मुद्दा बनवून सर्व पक्षांना फायदा मिळवायचा आहे असे ओवेसी म्हणाले. हैदराबादमध्ये पूर आलेला असतानाही भाजपने जनतेकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी लावला.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी भाजपसोबत वोटकटवा आहे, मी बी टीम आहे असे बिहारमध्ये काँग्रेसने म्हटले. येथे मात्र हैदराबादमध्ये कांग्रेस म्हणतोय की जर ओवेसींना मत द्यायचे नसेल तर आम्हाला द्या. भाजप काही वेगळेच म्हणत आहे. मात्र मला काहीच चिंता नाही, असे ओवेसी म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ओवेसी पुढे म्हणाले की, ‘म्हणजेच मी एक लैला आहे आणि प्रत्येकाला असे वाटते की माझा मुद्दा बनवून मते मिळवावीत, हैदराबादची जनता हे पाहत आहे की असदुद्दीन ओवेसींचा पक्ष हैदराबादची प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. हे तर आता जनताच ठरवेल.’

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.