Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतात आम्हीच कोरोना पसरवला; तबलिगी जमातीनं दिली गुन्ह्याची कबुली

कोरोना महासाथ आणि लॉकडाऊनदरम्यान गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था: लखनऊ, 25 फेब्रुवारी – भारतात आम्हीच कोरोना पसरवला, असा गुन्हा तबलिगी जमातनं कबूल केला आहे. परदेशातील तबलिगी जमातीच्या या आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. कोरोना महासाथ आणि लॉकडाऊनदरम्यान गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोनाच्या महासाथीत केंद्र आणि राज्य सरकारनं कठोर निर्बंध लागू केली होती. तरीदेखील तबलिगी जमातीचे परदेशातील हे लोक देशभर फिरले. यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे याच लोकांनी देशात कोरोना पसरवला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. टूरिस्ट व्हिजावर मशिदींमध्ये फिरून देशातील तबलिगी जमातीत सहभागी होऊन कोरोना पसरवण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या आरोपींविरोधात बहराइच, सीतापूर ,भदोही आणि लखनऊमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सर्व लोक थाइलँड, किर्गिस्तान, कजाकिस्तान,बांग्लादेशातील निवासी आहेत. त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत सीजेएम कोर्टात सुनावणी झाली. तब्बल 51 आरोपींना कोर्टानं शिक्षा ठोठावली गेली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

काय आहे तबलिगी जमात?

कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर तबलिगी जमात चर्चेत आली होती. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवल्याचा आरोप या संघटनेवर करण्यात आला. तबलिगी जमातीची सुरुवात 1926 मध्ये मेवात प्रांतात झाली. या जमातीची स्थापना मौलाना मुहम्मद इलियास यांनी केली होती. या जमातीचं मुख्य काम हे संपूर्ण जगभरात इस्लामचा प्रचार आणि प्रसार करणं हे आहे.

या जमातीचं मुख्यालय अर्थात हेडक्वार्टर ‘बंगलेवाली मस्जिद’ जिला निजामुद्दीन मर्कझ म्हटलं जातं या ठिकाणी आहे. हे त्यांचं ग्लोबल सेंटर आहे. जगातल्या 150 देशात या जामातीचे लोक राहतात. 15 ते 25 कोटी लोक या जमातीचं आचरण करतात.

Comments are closed.