Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मॉडेल अभिनेता मिलिंद सोमण न्यूड फोटो शेअर करणं महागात.

सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करणं मॉडेल अभिनेता मिलिंद सोमण यांना चांगलचं महागात पडलं आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गोव्याच्या बीचवर अश्लील व्हिडीओ चित्रीकरण केल्याने अभिनेत्री, मॉडल पूनम पांडेला अटक झाल्याची घटना ताजी असतानाच गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमण अडचणीत आले आहेत. मिलिंद सोमण यांनी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यूड होऊन पळतानाचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. सोमण यांच्या याच फोटोशूटवर गोवा सुरक्षा मंचने आक्षेप नोंदवत त्यांच्याविरोधात तक्रार नोंंदवली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिलिंद सोमण 4 नोव्हेंबरला आपल्या पत्नीसोबत गोव्यात गेले होते. त्यावेळी मिलिंद यांनी समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केला. तसेच स्वत:चा न्यूड फोटो आपल्या इन्टाग्राम अकाऊंटर पोस्ट करत फोटोला ‘हॅपी बर्थडे टू मी’ असं कॅप्शन दिलं. त्यानंतर मिलींद यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मिलींद यांच्या या फोटोवर गोव्यातील स्थानिक राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचने आक्षेप नोंदवला आहे. या पक्षाने मिलिंद सोमण यांच्याविरोधात वास्को पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी गोवा सुरक्षा मंचने ‘सोमण यांनी न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यामुळे गोव्याची प्रतिमा आणि संस्कृतीचा अपमान होत असल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्यामुळे सोमण यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी अभिनेत्री पूनम पांडे विरोधातही गोव्याच्या समुद्र किनारी आक्षेपार्ह व्हिडीओचे चित्रण केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.

Comments are closed.