Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खुशखबर! आता ऑल इंडिया परमिट घेणे झाले सोपे, केंद्र सरकार ने केली ऑनलाइन प्रक्रिया

  • केंद्र सरकारने आता ऑल इंडिया परमिटसाठी 1 एप्रिलपासून नवा नियम लागू केलेला आहे.
  • कोणताही पर्यटक वाहन ऑपरेटर ऑनलाईनद्वारे ऑल इंडिया टूरिस्ट ऑथरायजेशन/ परमिटसाठी अर्ज करू शकतो.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवी दिल्ली, १४ मार्च : केंद्र सरकाराने टूरिजमला प्रोत्साहन देण्यासाठी ऑल इंडिया टूरिस्ट परमिट ऑपरेटर्सना ऑनलाईन अर्ज जमा केल्यानंतर ३० दिवसांमध्ये परमिट मिळेल अशी माहिती दिली आहे. हा नियम १ एप्रिल २०२१ पासून लागू होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानेएका नव्या योजनेची घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत कोणताही पर्यटक वाहन ऑपरेटर ऑनलाईनद्वारे ऑल इंडिया टूरिस्ट ऑथरायजेशन/ परमिटसाठी अर्ज करू शकतो.

हा नियम संबंधित कागदपत्र जमा केल्यानंतर आणि फीस भरल्यानंतर जारी केला जाईल. यासाठीची कागदपत्र जमा करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा नवा नियम ऑल इंडिया टूरिस्ट ऑथरायजेश अँड परमिट रुल्स २०२१ रुपात ओळखला जाईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वर्षासाठी दिलं जाईल परमिट –

परिवहन मंत्रालयानुसार, या स्किममध्ये टूरिस्ट व्हिकल ऑपरेटर्सला वेळेची फ्लेक्सिबिलिटी मिळेल. याअंतर्गत ऑपरेटरला तीन महिन्याचं परमिट मिळेल. अधिकाधिक ३ वर्षांपर्यंत परमिट दिलं जाऊ शकेल. गेल्या काही वर्षात देशातील पर्यटनातील वाढीच्या दृष्टीने मंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे.

दरम्यान, १ एप्रिल २०२२ पासून सरकारी विभाग १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणीचं नुतनीकरण अर्थात रिन्यू करू शकणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा प्रस्ताव आणला आहे. याबाबत अंतिम निर्णय आल्यानंतर ही व्यवस्था अंमलात आणली जाईल. मंत्रालयाने याबाबत नियमांमध्ये बदल करण्यासाठी अधिसूचना जारी केली असून भागधारकांकडून यासंबंधी प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत. हा नियम सरकारी वाहनं, केंद्र आणि राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका संस्था आणि स्वायत्त संस्थांना लागू होईल.

Comments are closed.