Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी: दंडकारण्य माओवादी संघटनच्या अध्यक्षास पोलिसांनी केले जेरबंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

1 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षलवादी दंडकारण्य माओवादी संघटन चा अध्यक्ष पुनेम बिंदा (वय ४८) याला छत्तीसगढ पोलिसांनी केली अटक. 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

विजापूर, दि. ०४ जानेवारी:  छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर जिल्ह्यात खून, अपहरण व दरोडेखारीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या 1 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षलवादी दंडकारण्य माओवादी संघटन चा अध्यक्ष पुनेम बिंदा (वय ४८) याला छत्तीसगढ पोलिसांनी अटक केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात नक्षलविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून रविवारी उसूर पोलिस स्टेशन परिसरातील जिल्हा दलाची व CRPF ची २२९, २३९ तुकड्या ही नाडापल्ली, मारुदबाका येथे रवाना झाल्या होत्या.

खबऱ्याकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे डीएकेएमएस अध्यक्ष पुनेम बिंदा (वय ४८) याला मारुडबाका येथून अटक करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

छत्तीसगड माओवाद्यांच्या बक्षीस धोरणाअंतर्गत पकडलेल्या त्या नक्षलवाद्यावर १ लाखाचे बक्षीस जाहीर होते. तर विजापूर पोलीस अधीक्षकानेही १० हजार रुपयाचे बक्षीस ठेवले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा माओवादी २००६ मधील मारुडबाका आश्रम शाळेत शिक्षकांना बंदी बनवून तोडफोड करण्याच्या गुन्ह्यात शामील होता. ३१ जानेवारी २००७ ला पुजारी कांकेरच्या जंगलात पोलिस दलावर बॉम्बस्फोट व गोळीबाराच्या घटनेतही सामील होता. ४ ऑगस्ट २०१५ ला उसुर आवापल्ली मार्गावर खड्डे खोदून शासकीय संपत्तीचे नुकसान व मार्ग रोखण्याचा गुन्ह्यात तो माओवादी सामील होता व इतर लुटपाट व दोन गावकर्याच्या अपहरणाच्या गुन्ह्यात सामील होता.

या माओवाद्याला बिजापूर कोर्टात हजर करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.